माळेगाव यात्रेला लातूर कलेक्टर
वर्षा ठाकूर यांची भेट
पायी फिरून घेतला यात्रेचा अनुभव
माळाकोळी : नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सध्या लातूर जिल्ह्याच्या कलेक्टर वर्षा ठाकूर -घुगे यांनी काल श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला भेट देत संपूर्ण यात्रेचा अनुभव प्रत्यक्ष पायी फिरून घेतला.
यावेळी त्यांनी घोड्यांचा बाजार, घोंगडे मार्केट, पाळणे, बांगडी मार्केट तसेच भांडी मार्केट येथे भेट देत व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. अधिकाऱ्याचा नव्हे तर एक भाविक म्हणून यात्रेचा आनंद घेत त्यांनी यात्रेतील उत्साह अनुभवला. लोकसहभाग व सांस्कृतिक परंपरेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.