logo

चिखली सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुक मतमोजणी तयारी पूर्ण

चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चिखली सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुक मतमोजणी तयारी पूर्ण

सत्य कुटे/चिखली:
चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील सुधारित निर्देशानुसार दिनांक २१/१२/२०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल चिखली येथे सकाळी ठीक १०:०० वाजता पासून उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांची उपस्थितीत प्रथम स्ट्रॉग रूम उघडून व सर्व मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीयतेची शपथ देऊन सुरू करण्यात येणार आहे.
चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता १४ प्रभाग आहेत व या मतमोजणीसाठी एकूण ७ टेबल लावण्यात आलेले असून मतमोजणी प्रक्रिया ही दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक १ते ७ मधील मतदान केंद्रे व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक ८ ते १४ मधील मतदान केंद्र असे एकूण ६१ मतदान केंद्राचा समावेश आहे.
मतमोजणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्या मध्ये प्रभाग क्र.१ ते ७ मधील उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी व नगराध्यक्ष्य पदाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल तथा या टप्प्यामध्ये मतमोजणीच्या ५ फेरी होतील व पहिल्या टप्प्याची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर नगराध्यक्ष्य पदाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी सोडून प्रभाग क्र.१ ते ७ मधील उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्ष सोडवा लागेल, त्यानंतर लगेच प्रभाग क्र.८ ते १४ मधील उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवून मतमोजणी प्रक्रियेच्या द्वितीय टप्प्यास सुरुवात होईल व याही टप्प्यामध्ये मतमोजणीच्या ५ फेरी होतील, अशा मतमोजणीच्या एकूण १० फेरीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल व या १० हि फेरी व संपूर्ण १ ते १४ प्रभागाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगराध्यक्ष्य पदाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षामध्ये उपस्थित राहता येईल.
मतमोजणी कक्षातील प्रवेशा करता उमेदवार प्रतिनिधींना उमेदवाराच्या स्वीकृती पत्रानुसार प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्या प्रवेशिका बंधनकारक असून त्याशिवाय मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश करता येणार नाही तसेच मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन वर्जीत असून त्याची कडक तपासणी पोलीस दलामार्फत करण्यात येऊन मगच मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
मतमोजणी परिसरामध्ये स्वतंत्र मिडिया कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकारिता बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून ज्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रवेशिका (पासेस) आहेत त्याच प्रतिनिधींना मिडिया कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल.

7
312 views