जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा
पिंपळगाव सराई, बुलढाणा , महाराष्ट्र : येथील जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अविनाश असोलकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात अल्पसंख्याक समाजाच्या हक्क व अधिकारांविषयी माहिती देऊन करण्यात आली. अल्पसंख्याक समुदायाला समान संधी, न्याय व सन्मान मिळावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे वक्त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.यावेळी विद्यार्थ्यांना एकात्मता, बंधुता व सामाजिक सलोखा यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, सांस्कृतिक योगदानाबाबत माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता व परस्पर आदरभाव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुष्का गवते हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा गुंड हिने केले. कार्यक्रमाचे संयोजन दशरथ चिभडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.