logo

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी

जळगाव प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, या समारंभासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.

या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी राहणार असून, राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC), बंगळूरूचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन हे दीक्षांत भाषण करणार आहेत.

यावर्षीच्या दीक्षांत समारंभासाठी एकूण २९,०९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १२,२५९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ४,५९९, मानवविज्ञान विद्याशाखेतील ६,४१९ तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील २,२६० स्नातक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८७, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १,२७१, प्रताप महाविद्यालयाचे ८५२, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे ९६३, तसेच आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर येथील १८७ विद्यार्थ्यांचा समावेश असून, अशा एकूण ३,५६० विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे.

या दीक्षांत समारंभात गुणवत्ता यादीतील १२० विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार असून, यामध्ये ८८ मुले व ३२ मुली आहेत. तसेच १९५ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील या समारंभात पदवी स्वीकारणार आहेत.

38
1403 views