भारतीय सार्वजनिक तक्रार निवारण परिषदेत उपाध्यक्षपदी नियुक्ती बापूराव मते
अहिल्यानगर :
भारतीय सार्वजनिक तक्रार निवारण परिषदेमध्ये संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. बापूराव दशरथ मते यांची भारतीय सार्वजनिक तक्रार निवारण परिषद उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड रविराज शिंदे (जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर) यांनी केली आहे. बापूराव मते हे सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक प्रश्न व प्रशासनाशी संबंधित बाबींमध्ये त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा परिषदेला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीमुळे परिषद अधिक सक्षम होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्याने निवड झालेल्या बापूराव मते यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
— प्रसिद्धी विभाग
भारतीय सार्वजनिक तक्रार निवारण परिषद, अहिल्यानगर