logo

हुपरी मध्ये जन्मदात्या आई वडिलाचे खून करून मुलगा पोलिस स्टेशन मध्ये स्वतः हजर...

जन्मदात्या आई वडिलांचा खून करून मुलगा आरोपी स्वतः पोलिस स्टेशन मध्ये हजर झाला ही बातमी समजताच संपूर्ण शहर खळबळले आज सकाळी हुपरी शहर इंद्रायणी कॉर्नर परिसरात राहणारे नारायण गणपतराव भोसले आणि विजयमाला नारायण भोसले या पती पत्नीचा यांच्याच जन्म दिलेल्या मुलाने निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. या मधील आरोपी मुलगा सुनील नारायण भोसले याने खून करून स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होऊन आपण खून केल्याची कबुली दिली आणि या खुनाची उलगडा झाला. आरोपी मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केला असल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली...
घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस आणि फॉरेन्सिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शहा निशा करून पंचनामा आणि पुढील तपासाची कारवाही केली.खुणामागचे नेमके कारण कळाले नसल्याने हुपरी पोलीस खुनाचा पुढील तपास करत आहेत.


राहुल ओझा
इचलकरंजी
8956176450

0
196 views