logo

राष्ट्रीय स्तरावर अचूक निशाणा! ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कु. दर्शना गवते हिला कास्यपदक

राष्ट्रीय स्तरावर अचूक निशाणा!

६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कु. दर्शना गवते हिला कास्यपदक

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
लहानपणापासूनच खेळाची आवड, सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग, आई-वडिलांचे भक्कम मार्गदर्शन आणि अखंड प्रेरणा — या साऱ्यांच्या बळावर कु. दर्शना राजेंद्र गवते हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर पिस्तोल प्रकारात कास्यपदक पटकावून धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
मेहनतीचा घाम, जिद्दीचा श्वास आणि ध्येयावर रोखलेली नजर —
याच त्रिसूत्रीने या सुवर्णक्षणाची सुरुवात झाली.
नेम धरली मनात, नजर फक्त लक्ष्यावर,
गोळी सुटली आत्मविश्वासातून आणि पदक आले देशाच्या सन्मानावर!
घामाच्या थेंबांनी लिहिलेली ही यशकथा जिद्दीच्या शाईत रंगलेली आहे. दर्शना हिच्या या दैदीप्यमान यशाने आज संपूर्ण धुळे जिल्ह्याचा माथा अभिमानाने उंचावला आहे.
या यशामागे परमवीर शूटिंग अकॅडमी, स्टेडियम वाडीभोकर, धुळे येथील मार्गदर्शक आदरणीय श्री. विपिनजी सोनवणे व श्री. कपिलजी पाटील यांचे मोलाचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळेच दर्शना हिने राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
कु. दर्शना ही अमळनेर पंचायत समितीचे फाफोरे गटाचे
केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र गवते यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, रावसाहेब पाटील, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील ,शिक्षण विस्ताराधिकारी, सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक बंधू-भगिनी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

कु. दर्शना राजेंद्र गवते हिला या उज्ज्वल यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

1
12 views