logo

डेमी ग्राहक पाठवून राहत्या घरातील कुंटणखान्याचा भांडाफोड



दोन महिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : डमी ग्राहक पाठवून राहत्या घरामध्ये असलेल्या सुरु कुटणखान्यावर पोलिसांनी कारवाई करीत पाच महिलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १६) रात्री कुसुंबा खुर्द, ता. जळगाव येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन

महिलांसह चारजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक निरीक्षक अनिल वाघ, माधुरी बोरसे, उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलिस नाईक पंकज पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ईस्माईल खाटीक, राजेश्री बाविस्कर यांनी कारवाई केली.

डमी ग्राहकाने केला हाताने इशारा

कुंटणखान्याच्या ठिकाणी डमी ग्राहक पाठविला. त्याने तेथे पोहोचल्यावर हाताने इशारा केला. त्यावेळी पथक कुंटणखान्यामध्ये गेले असता तेथे सहा महिला व दोन पुरुष होते, तर एका खोलीमध्ये डमी ग्राहकासोबत एक महिला आढळली.

पोलिस नाईक पंकज पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. घरमालक दुर्गाबाई अवदेश पासवान (४३), तिचा मुलगा धनराज अवदेश पासवान (२१, दोन्ही रा. कुसुंबा, ता. जळगाव), शेख तोसिफ शेख रईस (३२, रा. स्सलपूर, ता. रावेर), शेख नुरी इद्रीस (४४, रा. अमळनेर) या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.



परराज्यासह अन्य जिल्ह्यातील महिला

या कुंटणखान्यामध्ये वेश्याव्यवसायासाठी कर्नाटकमधील महिलेसह जळगाव, मुंबई, रायगड, नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना आणल्याचे आढळले. या ठिकाणाहून सदर महिलांची सुटका करण्यात आली, तर रोख एक हजार रुपये, चार मोबाइल आदी जप्त करण्यात आले.

कर्नाटकसह अन्य जिल्ह्यातील पाच महिलांची कारवाईत सुटका करण्यात आली

8
275 views