logo

SDPI बीड चा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वी

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) बीड यांच्या वतीने आयोजित गेट-टुगेदर कार्यक्रम काल यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम SDPI चे जिल्हाध्यक्ष सैयद आबेद अब्बास तसेच उपाध्यक्ष श्याम दासू मागरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून
हाफिज मोहतसिम फलाही (SWC मेंबर, SDPI महाराष्ट्र) आणि
सौ. मरिया फातेमा (WIM मेंबर, परभणी) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक एकता आणि सामाजिक बांधिलकीवर भर दिला.
कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. बीड नगर परिषद निवडणुकीत सहभागी झालेल्या SDPI च्या चार उमेदवारांना जनतेकडून मिळालेल्या मतदान समर्थनाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी ही शुक्रान्याची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
जनतेने दाखवलेल्या विश्वास व सहकार्याबद्दल SDPI बीड च्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही जनहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
— जन-जन की आवाज़ | BEED

60
998 views