घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्या
जळगाव : शिरसोली प्र.न. येथील भिल्ल जमातीच्या ग्रामस्थांना पूर्वापार वास्तव्यास असलेल्या जागेचा लाभ द्यावा आणि घरकूल उभारण्यासाठी मदत करावी, अशी मागणी संविधान आर्मी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष विजय सोनू पवार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ७० ते ८० वर्षांपासून वास्तव्यास असलेली जागा भिल्ल समाजाच्या ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावी आणि त्या जागेत घरकुलांना मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रा.पं. पदाधिकारी स्थानिक राजकारणामुळे अन्याय करत आहेत, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पारंपरिक कट्टर विरोधक पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे आता शाखेने वाली महायुतीत सोबत आहेत. ते रविवारी (दि.१४), जळगाव शहारात तेली समाजाच्या वधुवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने एकाब व्यासपीठावर आले. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले