
समाज सहभाग व ग्रापंकडून इतलचेरू शाळेला साहित्य भेट
समाज सहभाग व ग्रापंकडून इतलचेरू शाळेला साहित्य भेट
अहेरी
समाज सहभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्याशिवाय शाळा विकासात गती येत नाही असे मत खमंचेरू ग्रामपंचायतीचे सरपंच सैलू मडावी यांनी शाळेला साहित्य वितरनावेळी मत व्यक्त केले.
आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,ईतलचेरू माजी विद्यार्थी संघ व ग्राम शिक्षण सल्लागार समिती ईतलचेरूचे सदस्य, मा.बाबुराव मडावी, मा.गुरुदास मडावी, मा.किशोर पेंदाम, मा.सतीश मडावी, मा.दादाजी मडावी मा.जीवनकला आलाम ह्यांच्या प्रयत्नांनी आणि ग्रामपंचायत खमनचेरु सरपंच मा.सैलु मडावी व ग्रामसेवक मा.कोबे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमतातून शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी व भौतिक विकासासाठी शाळेला उत्कृष्ट दर्जाचे 55 इंची Android सोनी टीव्ही, चर्चेबल साउंड सिस्टम, दोन वॉल फॅन, कॉम्प्युटर लॅब साठी वीस चेअर, एक ऑफीस विल चेअर आज शाळेला सस्नेही मनाने शाळेला भेट देण्यात आले.
आज सर्व मान्यवरांना बोलावून सहकार्यासाठी तसेच या राष्ट्रीय कार्यासाठी शाळेतर्फे मुख्याध्यापक खुर्शीद शेख, अमित बंडावार, कुमरे व ईतर शिक्षकांनी अभिनंदन व सर्वांचे आभार मानले.
यानंतर खमंचेरू शाळेला पेसा मधून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सरपंचाणी दिली.