logo

खुर्सापार येथे पशुसवर्धन विभाग सावनेर यांच्या वतीने पशुधन आरोग्य तपासणी व उपचार शिबिर यशस्वी

खुर्सापार येथे पशुसवर्धन विभाग सावनेर यांच्या वतीने पशुधन आरोग्य तपासणी व उपचार शिबिर यशस्वी

सावनेर तालुक्यातील खुर्सापार गावात पशुसवर्धन विभाग, सावनेर यांच्या नियोजनातून दि. 13 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय पशुधन आरोग्य तपासणी, रोगनिदान व औषधोपचार शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबिरामध्ये जवडपास गावातील 400 गाई, बैल, वासरे, म्हशी व बकरी यांचे विविध आजारांवर मोफत रोगनिदान, औषधोपचार तसेच औषधवाटप करण्यात आले.

या शिबिरासाठी सावनेर तहसीलमधील 6 ते 7 अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा दिली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भीमराव कोहाड, डॉ. गणेश डाखोले, सानेसर भाऊ, शहाणे भाऊ व राठोड भाऊ यांनी मोलाचे मार्गदर्शन व उपचार केले. त्यांच्या तत्पर सेवेमुळे गावातील पशुधनधारकांना मोठा लाभ झाला.

शिबिर यशस्वी होण्यासाठी खुर्सापार गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेत उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. या अभियानात खुर्सापार येथील सेवेकरी भूषण कुबडे, सुशील हिवरकर, रामदास आवारी, केशव मोहतकर, दुर्गेश आवारी, चैतन्य पटे, अनुज क्षीरसागर, हर्षल क्षीरसागर, अभिषेक वानखेडे, प्रतीक वानखेडे, राहुल काळे, ओम वानखेडे, सुधीर भुतमारे, भावेश वडकी व मंथन हिवरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

याच अनुशंगाने सावनेर–कळमेश्वर परिसरात निरंतर गौसेवा कार्य करत असणाऱ्या गौसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय बजरंग दल उपाध्यक्ष सावनेर कळमेश्वर चेतन दादा हेलोंडे
मंगेश भाऊ गमे राष्ट्रीय बजरंग दल कळमेश्वर तालुका अध्यक्ष
दिवाकरजी कडू,चेतन चांदेकर,
दिनेश पांडे, सतीश वानखेडे, हुकूम मालवी, धीरज बोंडेव त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुर्सापार येथे करण्यात आला.

या उपक्रमामुळे गावातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली असून पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी पशुसवर्धन विभाग, पशुवैद्यकीय डॉक्टर व सर्व सहकार्य करणाऱ्या तरुणांचे मनःपूर्वक आभार मानले.

102
5061 views