
मा. मुख्यमंत्र्यांची "लातूर - कल्याण" या जनकल्याण द्रुतगमी मार्गाची घोषणा, लातूर - मुंबई प्रवास होणार फक्त 5 तासांचा.
प्रेस नोट
लातूर
मा. मुख्यमंत्र्यांची "लातूर - कल्याण" या जनकल्याण द्रुतगमी मार्गाची घोषणा, लातूर - मुंबई प्रवास होणार फक्त 5 तासांचा.
इन्फ्रामॅन अशी ख्याती असलेले मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी 442 किमी लांबीच्या लातूर - कल्याण या द्रुतगती (Expressway) मार्गाची घोषणा केली आहे. लातूर - कल्याण द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविण्याचे काम लवकरच सुरु होणार असून अंदाजित 35 हजार कोटी रु. खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या वतीने हा महामार्ग निर्माण केला जाणार आहे. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिकरणासाठी आणि एकूणच कनेक्टिव्हिटीसाठी हा द्रुतगामी मार्ग नवसंजीवनी ठरणार आहे. या प्रकल्पाला जनकल्याण द्रुतगती मार्ग असे समर्पक नाव देण्यात आले आहे.
'लातूर ते कल्याण महामार्गावरील वाहनांना पुढे कल्याण वरुन मुंबईला जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागू नये यासाठी सदरील रस्त्यात किंचित बदल करून लातूर - अहिल्यानगर - माळशेज घाट मार्गे बदलापूर - वडोदरा एक्स्प्रेस वे वरील बोगद्यातून पनवेल जेएनपीटीला जोडण्यात यावे, जेणेकरून वाहनांना अटल सेतू किंवा मुंबई - गोवा द्रुतगती मार्गावरून मुंबईत जाता येईल' यासाठी मी आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किसनजी कथोरे हे पाठपुरावा करत होतो. 6 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले असता त्यांनी MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिलकुमारजी गायकवाड यांना तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आम्ही सुचवलेले बदल ग्राह्य धरूनच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. या संपूर्ण विषयात अनिलकुमारजी यांचीही महत्वाची आणि सकारात्मक भूमिका राहिली आहे. या प्रकल्पामुळे लातूर जिल्ह्याच्या विकासाला वायुगती प्राप्त होणार असुन मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री व मा. पालकमंत्री यांचे लातूरकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार.
Devendra Fadnavis BJP Maharashtra
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015