logo

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सल्लागार समितीची बैठक संपन्न; विद्यापीठाच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक

जळगाव प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सल्लागार समितीची बैठक आज दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, श्री. यज्ञुवेंद्र महाजन, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे तसेच कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या गेल्या एक वर्षातील शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला. यावर सल्लागार समितीच्या सदस्यांनी सखोल चर्चा करून विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. या कामगिरीमुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.

एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाने मिळविलेल्या यशाबद्दल तसेच ‘द विक-हंसा’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात विद्यापीठास देशात ९ वा क्रमांक मिळाल्याबद्दल कुलगुरू व सर्व अधिकार मंडळाचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात विद्यापीठाने प्रकाशित केलेली ओपन इलेक्टिव्ह विषयांची पुस्तके, सुरू केलेले नवे अभ्यासक्रम आणि त्यातून स्थानिक उद्योगांना उपलब्ध होणारे प्रशिक्षित मनुष्यबळ याबाबत विशेष प्रशंसा करण्यात आली.

याशिवाय सन २०२६ मध्ये विद्यापीठामार्फत केळी व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमाची रचना तसेच इतर नव्या शैक्षणिक व संशोधन प्रकल्पांना समितीने सहमती दिली.

या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जे. व्ही. साळी, प्रा. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. अजय पाटील, डॉ. दिनेश पाटील, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. कीर्ती कमळजा, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. व्ही. एम. रोकडे, प्रा. समीर नारखेडे तसेच वैशाली वराडे यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.

18
1611 views