logo

पाथर्डीत गोवंश कत्तलीवर मोठा छापा गुप्त माहितीवरून पोलिसांची पहाटे कारवाई; १.९४ लाखांचे मांस, हत्यारे व जिवंत जनावरे जप्त


अहिल्यानगर / पाथर्डी: पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील तिसगाव येथील रविवार पेठ भागात पोलिसांनी आज, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गोवंश हत्या आणि कत्तलखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३.५९ लाख रुपये किंमतीचे गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे आणि जिवंत गोवंश जप्त करण्यात आले आहेत.
अशी झाली कारवाई:
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४/१२/२०२५ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पोसई महादेव गुट्टे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. रविवार पेठ, तिसगाव, वॉर्ड नं ०२ येथे काही इसम गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल करत आहेत, तसेच काही जनावरे अन्न-पाण्याशिवाय निर्दयपणे बांधून ठेवलेली आहेत.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, पोसई गुट्टे यांनी दोन पंचांना सोबत घेऊन पहाटे ५:३० वाजता नमूद ठिकाणी छापा टाकला.
मुख्य आरोपीला अटक, सहा जण फरार
छाप्यादरम्यान, नासीर मोहम्मद कुरेशी (वय ४०, रा. रविवार पेठ, तिसगाव) हा व्यक्ती गोवंशीय जनावराची कत्तल करताना मिळून आला. पोलिसांनी त्याला जागीच अटक केली.
तसेच, बातमीतील अन्य आरोपी - खालीद मोहम्मद कुरेशी, फिरोज मोहम्मद कुरेशी, रेहान सालीम कुरेशी, जावाद सालीम कुरेशी, शाकीर सलीम कुरेशी आणि अजमत नुरा शेख हे मात्र पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेले.
जप्त केलेला मुद्देमाल (अंदाजित किंमत ₹ ३,५९,४००/-)
• गोमांस: एकूण सुमारे १४०० किलो अंदाजे गोवंश जातीचे कत्तल केलेले गोमांस (किंमत ₹ १,२०,००० + ₹ १,६०,००० = ₹ २,८०,०००)
• हत्यारे व वजनकाटा: कत्तलीसाठी लागणारे एकूण १९ लोखंडी हत्यारे (सुरे, चाकू, टोचे) आणि एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा. (₹ ८,५००)
• जिवंत गोवंश: कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या आणि निर्दयपणे वागवण्यात आलेल्या एकूण ०७ जिवंत गोवंश जातीच्या गाई, बैल आणि वासरे. (₹ ७०,९००)
पोसई गुट्टे यांनी जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत राखून ठेवले आहेत.
या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २७१, २७२, ३२५ सह महाराष्ट्र पशू संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(क), ९(अ) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणीण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या मुख्य आरोपीची चौकशी आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

138
6604 views