logo

दर्डा विधी महाविद्यालयात मानवाधिकार दिवसाचे आयोजन.

यवतमाळ:- विद्या प्रसारक मंडळ संचालीत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचावर डॉ. संदीप नगराळे , डॉ. वैशाली फाळे, डॉ. स्वप्नील सगणे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. संदीप नगराळे ह्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना व त्यानंतर स्विकृत करण्यात आलेला जागतिक मानवाधिकाराचा जाहीरनामा 1948 व त्यातल्या तरतुदी यावर भाष्य केले. जागतिक संस्कृती तथा प्रमुख धर्मातील मुल्ये समाविष्ट असलेला जाहिरणामा त्याचा भारतीय संविधानातील मुल्यांशी संबंध तथा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे यावर मार्गदर्शन करीत मानवाधिकार कायदा 1993 यावरही प्रकाश टाकला. आपल्या मानवाधिकारांसाठी आग्रही असतांना ईतरांच्या मानवाधिकारांचेही रक्षण करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. वैशाली फाळे यांनी केले तर आभार डॉ. स्वप्नील सगणे यांनी पार पाडले. यावेळी प्रा. पल्लवी हांडे तसेच मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

15
81 views