logo

बीड माजर शुम्बा घाट येथे टँकर घटनेबाबत अग्निशमन दलाची स्पष्ट भूमिका

केंद्र अधिकारी किशोर जाधव यांना मनापासून सलाम
बीड जिल्ह्यातील माजर शुम्बा घाट येथे काल घडलेल्या . टँकर घटनेनंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जन-जन की आवाजचे प्रतिनिधी शेख गालिब यांनी अग्निशमन केंद्र, नभर परिसर, बीड येथील केंद्र अधिकारी श्री. किशोर मालाबाई भगवान जाधव यांच्याशी थेट संवाद साधला. या संपूर्ण संवादाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटनेची खरी वस्तुस्थिती समोर आली आहे.
केंद्र अधिकारी किशोर जाधव यांनी माजर शुम्बा घाट येथील टँकर घटनेच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती, तांत्रिक अडचणी, उपलब्ध साधनसामग्री तसेच घटनास्थळी तात्काळ घेतलेले निर्णय याबाबत अत्यंत शांत, स्पष्ट आणि जबाबदार पद्धतीने माहिती दिली.
मर्यादित संसाधनांमध्येही अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. केंद्र अधिकारी म्हणून किशोर जाधव यांची भूमिका संयमी, अभ्यासपूर्ण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारी असल्याचे या संवादातून स्पष्ट होते.
दरम्यान, घटनेनंतर काही ठिकाणी अग्निशमन दलाबाबत गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, अग्निशमन दलावर करण्यात येणारे आरोप तथ्यहीन आहेत.
शहर व जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे, सत्य आणि कर्तव्याला प्राधान्य देणारे
केंद्र अधिकारी श्री. किशोर मालाबाई भगवान जाधव यांना मनापासून सलाम, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

✍️ जन-जन की आवाज
📍 बीड, महाराष्ट्र
प्रतिनिधी : शेख गालिब

32
578 views