logo

प्रभाग 18 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने प्रस्थापितांचे धाबे दणाणले




यवतमाळ:- मागील काही दिवसापासून शांत असलेला निवडणुकीचा रणसंग्राम पुन्हा जोमाने तयारीला लागला असून सर्वत्रच प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे.न्यायालयीन प्रकरणाच्या कारणास्तव लांबणीवर गेलेली निवडणूक २ डिसेंबर ऐवजी आता २० डिसेंबर रोजी होऊ घातलेली आहे.यामुळे सर्वच पक्षांमध्ये चळवळ सुरू झाली असून यवतमाळ शहरातील प्रभाग 18 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अरुणा सुकांत वंजारी यांच्या उमेदवारीने प्रस्थापित राजकीय पक्षांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
विशेष म्हणजे या प्रभागामध्ये अनुसूचित जाती जमातीची मतदारसंघ मोठ्या प्रमाणात असून यावेळी प्रभागात अनुसूचित जमाती अ गट राखीव असून ब गटातून सर्वसाधारण महिला करिता राखीव आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण महिला गटातून एकमेव अनुसूचित जातीच्या बौद्ध महिलेने वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी दाखल केल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नाकात दम आणला आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे धाबे दणाणले असून या उमेदवारीने नेमका नुकसान कोणाचे याचे तर्क वितर्क लावल्या जात आहे. या प्रभागात एकमेव बौद्ध महिला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा पाठिंबा या उमेदवाराला मिळत आहे. विशेष म्हणजे या प्रभागामध्ये आजवर कुठल्याही पक्षाकडून विकासात्मक मुद्द्यांवर चर्चाच करण्यात आली नसून केवळ मतदारांना विकासाच्या भूलथापा सर्वच राजकीय पक्षाकडून दिल्या गेल्या असल्यामुळे या प्रभागातील मतदारांमध्ये प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांबद्दल तीव्र नाराजी उमटत आहे.यामुळे यंदा सुज्ञ मतदारांकडून परिवर्तन घडवून नवीन नेतृत्वाला संधी दिल्या जाते की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

1
46 views