logo

विरदेल येथे जि.प.केंद्र शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात साजरा...

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

विरदेल (जिल्हा धुळे) येथील जि.प.केंद्र शाळा येथे दिनांक १२ डिसेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडल्या. विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्पर्धेचा संपूर्ण दिवस क्रीडारसिकांनी अनुभवला गेला
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. सुवर्णाताई सतीश बेहेरे (सरपंच, ग्रामपंचायत विरदेल) यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री सतीश बेहेरे (सामाजिक कार्यकर्ते), श्री.किरण जोशी (सामाजिक कार्यकर्ते) व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
स्पर्धेचे संयोजन आणि मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री. गुलाबराव सोनवणे यांनी पाहिले.
तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शान वाढवणारी ठरली त्यामध्ये –
श्री जे. एस. पाटील सर – प्राचार्य, विद्यालय विरदेल
श्री गोसावी सर – पर्यवेक्षक, देवकर विद्यालय विरदेल
केंद्र मुख्याध्यापक श्री साळुंके सर
चव्हाण सर / पवार सर – मुख्याध्यापक, जि.प. शाळा दलवाडे
विजयकुमार पाटील – मुख्याध्यापक, जि.प. शाळा नवेअच्छी
योगेंद्र पाटील – मुख्याध्यापक, जि.प. शाळा हिसपूर
विशाल कोळी – मुख्याध्यापक, जि.प. शाळा जुनेअच्छी
गणेश नागरगोजे – मुख्याध्यापक, जि.प. शाळा रंजाणे
प्रकाश सोनावने – मुख्याध्यापक, जि.प. शाळा जसाने
केदार सर – मुख्याध्यापक, जि.प. आठ शाळा चिलाने
विरदेल येथील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर
या व्यतिरिक्त केंद्रातील परिश्रमी शिक्षक श्री भूषण बच्छाव सर, इंगळे सर, गणेश आहेर सर यांनीही उत्कृष्ट सहकार्य केले.
पंच म्हणून देवकर विद्यालयाचे श्री निकम सर यांनी धुरा उत्कृष्टपणे निकोप वातावरणात पार पाडली.
दिवसभरात ५० मी धावणे, उंच उडी , लांब उडी , लंगडी , स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सर्व स्पर्धकांनी खेळभावना, शिस्त आणि क्रीडामूल्यांचा उच्चांक गाठला. विजेत्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली क्रीडा क्षमता उजागर झाली असून केंद्र शाळा विरदेलने उत्कृष्ट आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे.शेवटी सर्व मान्यवरांनी संयोजकांचे व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

98
3764 views