logo

अल्पवयीन मुलाचा कळेपडळ रेल्वे रुळावर मृतदेह, किडनी काढल्याचा संशय

पुणे : हडपसरच्या काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. कळेपडळ रेल्वे रुळावर अल्पवायीन मुलाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, त्याची किडनी काढून घेतल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

मृत मुलाची ओळख प्रकाश दाबले भूल (वय ११, रा. गंधर्व गीत सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) अशी झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रकाशचा मृतदेह रुळावर पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

सूचना मिळताच सहायक निरीक्षक निंबाळकर व पोलीस अंमलदार भंडारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात हलवण्यात आला, जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

मुलाच्या पोटावर कापल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची किडनी काढून घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक अंगाने पोलिसांनीही तपासाची दिशा विस्तारित केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासण्यात येत आहेत.

अल्पवयीन मुलाचा असा मृतदेह आढळल्याने हडपसर परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर आणण्याची मागणी केली आहे.

41
1640 views