logo

विषय : दौंड उपजिल्हा रुग्णालयात कॅन्सर व क्षयरोग (TB) तपासणी शिबिरे अनेक महिन्यांपासून न घेणे तसेच रुग्णांना जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयात पाठविणे याबा

कायदेशीर तक्रार अर्ज सार्वजनिक आरोग्य व कायद्याची अंमलबजावणी संदर्भात

विषय : दौंड उपजिल्हा रुग्णालयात कॅन्सर व क्षयरोग (TB) तपासणी शिबिरे अनेक महिन्यांपासून न घेणे तसेच रुग्णांना जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयात पाठविणे याबाबत तक्रार.

महोदय,
मी खालीलप्रमाणे आपणाकडे गंभीर तक्रार सादर करीत आहे :

1. दौंड उपजिल्हा रुग्णालयात कॅन्सर व TB तपासणी शिबिरे अनेक महिन्यांपासून आयोजित केली जात नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत तपासणीची महत्त्वाची संधी मिळत नाही.

2. रुग्णालय प्रशासनाकडून जाणीवपूर्वक रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. हे सार्वजनिक आरोग्य सेवेच्या नियमांच्या विरोधात व नागरिकांच्या हक्कांवर अन्यायकारक आहे.

3. डिलिव्हरीसारखे अत्यावश्यक उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांनाही वार्ड नं. 21 मधून “डॉक्टर उपलब्ध नाहीत”, “ICU लागू शकते” अशा कारणांखाली बाहेर पाठविले जात आहे. ही अत्यंत गंभीर आणि जीवितास धोका निर्माण करणारी बाब आहे.

4. सरकारी रुग्णालयात उपचार घेणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, डॉक्टर व रुग्णालय प्रशासनावर उपलब्ध वैद्यकीय सुविधा प्रामाणिकपणे देण्याची जबाबदारी आहे.

वरील बाबींची तत्काळ चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर आवश्यक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी तसेच :

कॅन्सर व TB तपासणी शिबिरे त्वरित सुरू करावीत,

वार्ड 21 मध्ये 24x7 डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करावी,

रुग्णांना अनावश्यकपणे खाजगी रुग्णालयात पाठविणे तात्काळ थांबवावे,

डिलिव्हरी व आपत्कालीन रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून द्यावेत,
ही नम्र विनंती.

0
46 views