logo

उर्दू मिल्लिया स्कूलबाहेर कचऱ्याचे साम्राज्य — मुलांच्या आरोग्यावर गंभीर धोका! नगर परिषदेच्या भोंगस व्यवस्थेमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी!"

महाराष्ट्र।बीड च्या कीला मैदान परिसरात असलेल्या उर्दू मिल्लिया स्कूलबाहेर कचरा अक्षरशः रस्त्यावर वाहू लागला आहे. प्लास्टिक, घाण, उकिरडा… आणि त्यावर आवारा कुत्री व बकऱ्यांचा मुक्त संचार—हा सगळा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून, नगर परिषदेने याकडे डोळे झाकल्याचं चित्र स्पष्ट आहे.
दिवसाढवळ्या या कचऱ्यावर कुत्री फिरताना दिसतात, तर संध्याकाळी ही परिस्थिती आणखी भयावह होते. शाळेत जाणारी आणि शाळेतून घरी परतणारी लहान मुले—नुसती ५वी-६वी नाही—तर अगदी १ली ते ४थीची छोट्या छोट्या मुलांची ओळ या कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारूनच जाते.
काही पालकांनी सांगितले की,
“मुलं शाळेतून परतताना हाच रस्ता वापरतात… कचरा आणि कुत्र्यांमध्ये घुसून जाणं त्यांची मजबुरी झाली आहे. उद्या एखाद्या मुलाला कुत्र्याने चावलं तर जबाबदार कोण?”
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा सूचना केल्या, परंतु नगर परिषदेची भोंगस वागणूक आणि बेफिकिरी कमी होण्याचं नाव घेत नाही. कचऱ्याचा पसारा कमी करण्याची कोणतीही हालचाल न दिसल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहे.
फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की कचऱ्यावर प्राणी खादाड करत आहेत, गाडीच्या बाजूला कचरा साचून रस्ता अरुंद झाला आहे, आणि परिसर पूर्णतः अस्वच्छतेने व्यापला आहे. हे सगळं शाळेच्या अगदी दाराशी घडत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे.
नागरिकांचा सवाल आता एकच आहेः
“मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या कचऱ्याला आणि आवारा प्राण्यांना थोपवणार कोण? आणि उद्या एखाद्या चिमुकल्याला दुखापत झाली तर शहर प्रशासनाला झोप उडेल का?”
"मुलांच्या आरोग्याशी खेळ… आणि प्रशासन शांत!
जन-जन की आवाज — प्रतिनिधि शेख ग़ालिब MEDIA"

40
2527 views