logo

Aima media jan jan ki आवाज दिनांक : 11/12/2025 am7:15 PMC Election History: आई विरुद्ध मामा: बाळासाहेब शिवरकर यांच्या पहिल्या निवडणुकीतील चुरशीचा सं

Aima media jan jan ki आवाज
दिनांक : 11/12/2025 am7:15
PMC Election History: आई विरुद्ध मामा: बाळासाहेब शिवरकर यांच्या पहिल्या निवडणुकीतील चुरशीचा संघर्ष आई अन्‌‍ मामा प्रचारात उतरले परस्परांच्या विरोधात

माजी नगरसेवक, महापौर, आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष, प्रादेशिक नगररचना मंडळाचे सदस्य, मितभाषी व निष्ठावान नेते, अशी बाळासाहेब शिवरकर यांची ओळख. वयाच्या 21 व्या वर्षीच राजकारणात त्यांचे पहिले पाऊल पडले. त्यानंतर तीन वेळा नगरसेवक, महापौर आणि तीन वेळा आमदार म्हणून त्यांनी वानवडी आणि पुणेकरांचे प्रतिनिधित्व केले. महापालिकेची पहिली निवडणूक त्यांना आपल्या सख्ख्या मामेभावाविरुद्धच लढावी लागली. या निवडणुकीच्या आठवणी त्यांच्याच शब्दात...
बाळासाहेब शिवरकर

वानवडीतील एक कार्यकर्ता म्हणून 1971 पासून माझा राजकारणाशी संबंध आला. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोहन धारिया उभे होते. वानवडी परिसरात त्यांच्या प्रचाराची जबाबदारी आम्हा तरुणांवर होती. प्रचाराची पॅम्प्लेट्‌‍स वाटणे, मतदार याद्यांनुसार स्लिपा तयार करणे आणि त्या घरोघर पोहोचविणे, पोस्टर्स चिकटविणे, अशी सारी कामे आम्ही त्यावेळी उत्साहाने केली. त्यानंतर 1972 मध्ये शिवाजीराव ढेरे यांचा प्रचारही याच पद्धतीने केला. माझ्या वडिलांनी दोन निवडणुका लढविल्या असल्याने त्याचा अनुभवही गाठीशी होताच.
अशात 1974 मध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी माझी पदवीची परीक्षा सुरू होती. उमेदवारांच्या मुलाखती ज्या दिवशी होत्या, नेमक्या त्याच दिवशी माझा पदवी परीक्षेचा पेपरही होता. परंतु, त्याला न जाता मी मुलाखतीला गेलो. वानवडी परिसरातील दीड- दोनशे कार्यकर्तेही सोबत होते. एवढी मोठी फौज पाहून मुलाखती घेणाऱ्या मोहन धारिया यांनी कार्यकर्त्यांनाच विचारले, ‌‘शिवरकर यांना निवडून देणार ना?‌’ जल्लोषात त्यांनी दिलेला होकार ऐकून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.

0
0 views