दुबार शोधण्यासाठी ५१२ जणांची टीम ३५८ बीएलओंची मदत : पाच दिवसांची मुदतवाढ
जळगाव: महापालिका जाहीर निवडणुकीसाठी झालेल्या मतदार यादीत ३३ हजार दुबार मतदार असल्याने त्यांचा घेण्यासाठी शोध आता ३५८ बीएलओंची मदत घेतली जाणार असून, या कामासाठी आता ५१२ जणांची टीम काम करणार आहे. मंगळवारी सर्व बीएलओंची महापालिकेत बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यातआल्या. दुबार मतदार शोधाचे कामासाठी ५ दिवसांची मुदतवाढ टेन्शन असताना आता या मिळाली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार होती. आता ती. १५ डिसेंबर रोजी होणार आहे.मतदारांची दुबार नाये आढळल्यामुळे टीका होत असून, ही नावे वगळावी म्हणून मागणी होत आहेआधीच्या कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर रोजी मतदार यादी केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता २० डिसेंबर रोजी होणार आहे तर मतदान केंद्रावर २७ डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध होणार आहे.हरकती निकाली काढल्यादाखल झालेल्या एकूण १८,७५५ हरकती निकाली काढण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यातील काही हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत.मतदारांची अचूक माहिती बीएलओंना आहे. त्यामुळे त्यांची मदत घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शहरातील ३५८ बीएलओंची बैठक बोलावली होती. अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे यांनी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या पथकांसोबत बीएलओ नियुक्त केले. या सर्व बीएलओंना त्यांचे मूळ काम सांभाळून हे काम करावे लागणार आहे.