logo

नाशिक – दुर्दैवी अपघातात पाच भाविकांचा मृत्यू

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवाने काळाने घाला घातला. सप्तशृंगी गडावरून परतत असताना गणपती पॉइंटजवळ एमएच १५ बीएन ०५५५ क्रमांकाची इनोव्हा कार अंदाजे १००० ते १२०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला.

या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास सुरू आहे.

सप्तशृंगी गड परिसरातील या भीषण अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

21
446 views