logo

सन 1993 च्या गुन्ह्यातील पकड वॉरंटमधील फरार आरोपी यास पुणे येथुन 32 वर्षानंतर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडुन जेरबंद, ..

दिनांक :- 06/12/2025

-------------
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. सह दिवाणी न्यायधीश सो. न्यायालय क्रमांक 19, अहमदनगर यांचेकडुन केस नंबर आर.सी.सी 300124/1993 मधील आरोपी नामे तान्हाजी जालिंदर म्हस्के यांचे विरुध्दचे पकडण्याचे वॉरंट स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे प्राप्त झाले होते.
सदर पकड वॉरंटची बाजवणी करणे कामी पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विष्णु भागवत, दिपक घाटकर, फुरकान शेख, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन वॉरंट मधील आरोपीचे शोध घेण बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने वॉरंटमधील आरोपीचे व्यवसायीक कौशल्य वापरुन शोध घेत असतांना आरोपी हा नांदेड सिटी, पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे राहत असले बाबत माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ नांदेड सिटी, पोलीस स्टेशन, पुणे शहर याठिकाणी जावुन पथकाने शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव तान्हाजी जालिंदर म्हस्के वय -53 वर्षे मुळ रा. एम.ई.एस. क्वार्डर, खडकवासला पुणे रा. हल्ली रा. धायरीवाडी, रायकरमळा,ता. हवेली, जि.पुणे असे असल्याचे सांगितले आहे.
त्यानंतर सदर वॉरंटमधील आरोपी नामे तान्हाजी जालिंदर म्हस्के वय -53 वर्षे मुळ रा. एम.ई.एस. क्वार्डर, खडकवासला पुणे रा. हल्ली रा. धायरीवाडी, रायकरमळा,ता. हवेली, जि.पुणे यास पुढील कारवाई करीता मा. सह दिवाणी न्यायधीश सो. न्यायालय क्रमांक 19, अहमदनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

34
782 views