
राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य परिषदेसाठी जळगाव सज्ज
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ७ जानेवारी २०२६ रोजी भव्य आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि मानव्यविद्या प्रशाळेतर्फे “शास्त्रीय नृत्याचा गौरवशाली वारसा” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद ७ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठात संपन्न होणार असून उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची परिषद आयोजित होत आहे. परिषदेत देश-विदेशातील नामांकित नृत्यतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रीय नृत्याच्या इतिहास, परंपरा, विविध शैली, संशोधन, तांत्रिक पैलू व आधुनिक नृत्य प्रवाह यावर सखोल सत्रे घेण्यात येणार असून प्रत्यक्ष नृत्यसादरीकरणांचाही समावेश आहे.
या परिषदेत प्रमुख तज्ञ म्हणून —
प्रा. संध्या पुरेचा, अध्यक्ष, संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली (भरतनाट्यम)
डॉ. स्वाती दैठणकर, नृत्य प्रवर्तक, संशोधक (भरतनाट्यम-नृत्य योग), पुणे
प्रीतिलेखा डी. चौधरी, शिलाँग, मेघालय (सत्रिय नृत्य)
मुरली मोहन कालवाकालवा, बँकॉक, थायलंड (कथ्थक नृत्य)
प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, विभाग प्रमुख, नाटक-संगीत-नृत्य-योगशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
हे तज्ञ सहभागींचे मार्गदर्शन करणार आहेत.
ही राष्ट्रीय परिषद सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी, कला अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी अद्वितीय संधी आहे.
नोंदणी सुरू
इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी खालील लिंकवर करावी :
🔗 https://forms.easebuzz.in/register/FAOcZgp8/National_Classical_Dance_Conference_Date_07_01_2026
शोधनिबंध स्वीकार
संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून आपले शोधनिबंध 15 डिसेंबर पर्यंत खालील ईमेलवर पाठवावेत :
📧 ccdkbcnmu2026@gmail.com
संपर्क
सौ. नेहा जोशी – 9423978208
डॉ. सुचित्रा लोंढे – 9892906374
प्रा. डॉ. राम भावसार – 9518586323