logo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दिनदुबळ्यांचे कैवारी- प्राचार्या वर्षा चांदेकर

महिला अध्यापक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा

विलास केजरकर भंडारा.
भंडारा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतमातेच्या महान सुपुत्रांपैकी एक होते. समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान प्रचंड महत्त्वाचे आहे. महान अर्थतज्ज्ञ, थोर समाजसुधारक, महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजाच्या तळागाळातील लोकांच्या उद्धारासाठी सदैव लढले. त्यांचा विविध धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. ते एक पत्रकार, जगद्विख्यात वकीलसुद्धा होते. त्यांनी स्वतःला सामाजिक चळवळीसाठी वाहून घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्यातला भारत कसा असेल याबद्दलचे त्यांचे 'व्हिजन' होते. राष्ट्राचे भवितव्य ठरवितांना लोक, नेते, पक्ष यांच्या प्रतिष्ठेचे नव्हे तर देशाच्या सामूहिक प्रतिष्ठेचे मूल्य हेच प्राधान्य असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आपण सर्व जण भारतीय आहोत अशी भावना निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दिनदुबळ्यांचे कैवारी आहेत. असे प्रतिपादन महिला अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा चांदेकर यांनी केले.
त्या महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. काजल बुजाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कु. स्नेहा ए. शेंडे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या वर्षा चांदेकर, प्राध्यापक गणेश किरसान व महिला अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व छात्रध्यापक विद्यार्थिनींनी गित व भाषण देऊन विविध मार्मिक उदाहरण देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिंपल मांदाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्नेहा आर शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रूषाली राघोर्ते, साक्षी मेश्राम, किरण घोनमोडे, शेजल भुरे, सानिया इंदुरकर, प्रांजली मारवाडे, मयुरी येळणे, आचल शेंडे, पल्लवी गभणे, साक्षी राखडे, मनोज टेकाम, सानिया इंदुरकर, वैष्णवी राखे, सिमा पवनकर, आरती घोनमोडे, प्राची ढोमणे, पायल माकडे, कोमल सहाकाटे, वैष्णवी गिदमारे, रविना कांबळे, साक्षी धांडे, करिष्मा चोले व महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिक्षकेत्तर कर्मचारी, इत्यादी छात्रध्यापक विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

6
364 views