फ्लोअरबॉल खेळाडूंनी राज्याचे नाव लौकिक करावे - भारतीय फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव रविंद्र चोथवे
फ्लोअरबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- राज्यस्तरिय फ्लोअरबॉल स्पर्धेचे प्रतिनिधी करण्यासाठी खेळाडूंना रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्याचे फलित म्हणजे खेळाडूंनी आपल्या जिल्हृयाचे नाव लौकीक करण्यासाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगुन यश संपादन करावे आणि पुढील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य व देशाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन भारतीय फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव रविंद्र चोथवे यांनी केले.
ते शनिवार दिनांक ६ डिसेंबर ला भंडाऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील बॅटमिंटन हॉल येथे फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली व भंडारा जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे अंडर १२, अंडर १७ व वरिष्ठ गटाची राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा २०२५-२६ च्या स्पर्धेचे उद्घाटन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव रविंद्र चोथवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव सुनील कुरंजेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, तिरंदाजी संघटनेचे सचिव आशिक चुटे, दिपक वाडे, स्नेहलता भगत, रामभाऊ नागपूरे, सागर भगत, सोहेब अंसारी, स्वप्निल अंबुले, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, देवराव लाडे, पत्रकार समीर नवाज, कुस्ती मार्गदर्शक विलास केजरकर, डॉ. प्रकाश चोपडे, अनिल शहारे, सचिन भेंडे, विलास सातपुते, बाजीराव भुतेकर, भंडारा जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेचे पदाधिकारी निशिकांत इलमे, दुर्गेश पवार, अविनाश वाघ, सौरभ तोमर, बेनिलाल चौधरी, अरूण बांडेबुचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
त्यावेळी भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव सुनील कुरंजेकर यांनी खेळाडूचे जिवन पध्दतीने जवळून पाहिले आहे. ऊन, वारा, पाऊस, हिवाळा या ऋतुची पर्वा न करता अभ्यासाबरोबर मैदानावर कमालीची कामगिरी करावे लागते असे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
फ्लोअरबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचा प्रथम सामना धुळे विरूद्ध जळगाव या संघात अतिशय रोमांचक सामन्याची सुरूवात करण्यात आली. आणि त्या अटातटीच्या सामन्यात ३-१ ने धुळेच्या संघाने विजय मिळविला आहे.
राज्यस्तरीय फ्लोअरबॉल अजिंक्य स्पर्धेत महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, औरंगाबाद जिल्ह्यातील चमुतील महिला -पुरूष खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच सह ५०० च्यावर सहभागी झाले आहेत.
त्यावेळी स्वप्निल गुडेकर, प्रफुल्ल सुर्यवंशी, तेजश बोरकर, मितेश सोनको, नितेश तडवी, मित त्रिवेदी, आरीफ अन्सारी, मयुर पाटील, आदर्श चिवंडे यांनी पंचांची यांनी उत्कृष्ट व योग्य कामगिरी बजावली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार भंडारा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी निशिकांत इलमे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंजिरी तांबे, शौर्य बांते, प्रिन्सी शहारे, वेदांती कुरंजेकर, तन्मय लांजेवार, चेतन वाकेकर, श्रेयस कुरंजेकर, वैभवी संगीतराव, भुनेश नागोशे, पोलो इत्यादी व भंडारा जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.