logo

मुंबई... महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी कार्य करता असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या स्वयंसेवकांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भेट घेतली


महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी कार्य करता असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या स्वयंसेवकांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी पार्क येथील अनुयायांना दिल्या जाणाऱ्या सोय-सुविधांची पाहणी केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी मुंबईला येतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सतत मागणी करत आहे.

नेहमीप्रमाणे यावर्षीही वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक अनुयायांच्या सेवेसाठी कार्य करत आहेत.

14
899 views