logo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.....

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.....
स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय,धोडप बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली व्यक्त करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड सर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक दिलीप भिसडे यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य,विचार आणि सामाजिक कार्य यावर आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपले मत सादर केले.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी समानता बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व सांगत बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल परिचय करून दिला. संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांनी शिका,संघर्ष करा व संघटित व्हा असा मोलाचा उपदेश विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय आढाव यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत बोडखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

39
1619 views