logo

बीड बालेपीर नगर रोडवरील धोक्यावर ‘जन-जनची आवाज’ उचलली होती – पण प्रशासन झोपेत! रात्री गंभीर अपघात

महाराष्ट्र बीड च्या बालेपीर नगर रोडवरील धोकादायक परिस्थितीबाबत ‘जन-जनची आवाज’ म्हणून पत्रकार Shaikh Galib यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला होता.
रस्ता फक्त १० फूट रुंद, कचऱ्याचा ढिग, मोकाट जनावरे, तसेच अर्धवट रस्त्याचे काम — यामुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका असल्याचे त्यांनी ठळकपणे दाखवून दिले होते.
परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने, काल रात्रीच एक मोठा अपघात घडला. एका कारचाप्रचंड नुकसान झाला असून प्रसंग अत्यंत भीषण होता. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
स्थानिक नागरिकांचा संताप:
“Shaikh Galib यांनी आधीच इशारा दिला होता! मग प्रशासनाने कानावर का घेतले नाही? आणखी किती अपघात झाल्यावर ते जागे होणार?”
घटनास्थळी अद्यापही दगड, लोखंडी पट्टे, कचरा आणि अव्यवस्थित रस्ता दिसत आहे, ज्यावरून अपघात कसा घडला याची कल्पना येते.
नागरिकांची तातडीची मागणी:
रस्त्याचे तातडीने डांबरीकरण
कचरा पूर्ण हटवणे
मोकाट जनावरांवर नियंत्रण
वाहतूक सुरक्षेसाठी ताबडतोब उपाय
प्रशासनाने तात्काळ कृती न केल्यास अशीच दुर्घटना पुन्हा घडण्याची शक्यता वाढली आहे.
📍 स्थान: बालेपीर नगर रोड, बीड
✍️ जन-जनची आवाज – पत्रकार: Shaikh Galib

107
4265 views