logo

बीड – बालेपीर नगर रोडवरील धोकादायक रस्त्याने घेतला ‘अपघाताचा’ बळी

महाराष्ट्र.बीड च्या बालेपीर नगर रोडवरील रस्त्याची बिकट अवस्था, कचऱ्याचा ढिग, आणि अर्धवट ठेवलेले काम याबाबत कालच नागरिकांनी आवाज उठवला होता.
परंतु प्रशासन झोपेत असताना रात्रीच एका कारचा मोठा अपघात झाला, ज्यात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
स्थानिकांच्या सांगण्यानुसार,
“रस्ता फक्त १० फूट उरला आहे, दोन्हीकडे कचरा आणि मोकाट जनावरे… अपघात होणारच होता!”
घटनास्थळी अजूनही कचरा, दगड, लोखंडी पत्रे आणि रस्त्यावर विखुरलेला मलबा दिसत असल्याने हा अपघात नेमका कसा घडला, हे स्पष्टच होते.
नागरिकांचा संताप:
“आम्ही आधीच इशारा दिला होता! तरीही प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही. आणखी किती अपघात झाल्यावर हालचाल होणार?”
या घटनेनंतर नागरिक प्रशासनाकडून तात्काळ:
रस्ता दुरुस्ती
कचरा साफसफाई
मोकाट जनावरांवर नियंत्रण
वाहतुकीसाठी तात्पुरती सुरक्षित व्यवस्था
यांची मागणी जोरदारपणे करत आहेत.
📍 स्थान: बालेपीर नगर रोड, बीड
✍️ रिपोर्टिंग: Shaikh Galeb

164
8678 views