logo

अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण



जळगाव : वाचनालय, अभिलेख कक्षाची
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील धूळ खात असलेल्या फायली आणि जीर्ण दस्तऐवज पाहून या कक्षाचे आधुनिकीकरण करण्याचे निर्देश घुगे यांनी दिले.

शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वाचनालय, अभिलेख कक्ष तसेच संपूर्ण कार्यालयीन आवारातील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी अभिलेख कक्षाचे अद्ययावत, कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक सुधारणा व दुरुस्ती, संपूर्ण कार्यालय परिसराची स्वच्छता नियमित राखण्याचे निर्देश दिले. धूळखात असलेल्या आणि जीर्ण दस्तऐवज पाहून विविध सूचना दिल्या.

13
258 views