logo

सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे मुंबई येथील ऐरोलीतील व्हाईट हाऊस मध्ये ट्रेलर व पोस्टर लॉन्च कार्यक्रम संपन्न

सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे ट्रेलर पोस्टर लॉन्च चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक यांच्या ऐरोली मधील व्हाईट हाऊस या त्यांच्या कार्यालयात पार पडला.
आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या कार्यालयातील प्रोजेक्टवर त्यांना व आलेल्या पाहुण्यांना सावित्री कलियुगातली या मराठी चित्रपटाचे ट्रेलर दाखवण्यात आले. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी चित्रपटाबद्दल खूप चांगले मत प्रदर्शित केले. ते म्हटले की आजच्या एवढ्या आधुनिक युगातही एवढे सुंदर कंटेंट करणाऱ्या निर्माता नानासाहेब बच्छाव व दिग्दर्शक प्यारेलाल जी शर्मा यांचे मी कौतुक करतो. आपला चित्रपट स्री प्रधान असल्याकारणाने खूप चालेल. अशाच असे जर चांगले चित्रपट तयार केले तर मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस येतील. व 26 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तरी आपण सर्वांनी चित्रपट पाहण्यास जावे.अशा शुभेच्छा व आशीर्वाद दिले. सावित्री कलियुगातील या मराठी चित्रपटाच्या सर्व कलाकार अभिनेत्री श्वेता भामरे, खलनायक नाना बच्छाव व जयराज नायर यांचे कौतुक व अभिनंदन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एरोली मतदारसंघाचे माजी नगरसेवक आदरणीय जी एस पाटील यांनी तनमनधनाने मदत केली व कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला मुंबईचे पत्रकार व समाजसेवक हजर होते तसेच रवी गजभिये अमरावती व कैलास गरुड हजर होते.

47
1319 views