logo

आंधळगाव फळ रोपवाटिका भेट

विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील तालुका फळ रोपवाटिका येथे भेट देऊन विविध फळझाडांच्या रोपोत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ आदी फळझाडांच्या गुणवंत्तायुक्त रोपांची तयारी कशी केली जाते याची प्रत्यक्ष पाहणी केली.
भेटीदरम्यान कृषी अधिकारी गिदमारे साहेब, तिडके मॅडम, रोपवाटिकेतील समर्पित कर्मचारीवर्ग तसेच कंत्राटदार वसंत गहाणे उपस्थित होते.
सर्वांसोबत संवाद साधून रोपवाटिकेतील कामकाज, उपलब्ध सुविधा आणि सध्या भेडसावत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला.
सध्या रोपवाटिकेत पाणीटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे रोपोत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळाली. या समस्या तातडीने दूर करून रोपवाटिकेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

3
48 views