logo

७ ला ३५० शहीदी शताब्दी समारोहाचे आयोजन

विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- महाराष्ट्र सरकार, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वीं शहीदी समागम राज्यस्तरीय समिती व समस्त सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाच्या वतीने दि. ७ डिसेंबर २०२५ ला सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरेश चंद्र सुरी ग्राउंड, ख. नंबर १६८, जरीपटका पोलिस स्टेशन रोड, नारा, नागपूर येथे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यावेळी संत ज्ञानी महंत मार्गदर्शन करणार आहेत. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी समारंभ गुरु तेग बहादूर साहिब जी यांची शहिदी संपूर्ण मानव जातीच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सत्यासाठी होते. या प्रसंगी पवित्र शीख, सिकलीगर, लबारा, बंजारा, मोहयाल, सिंधी आणि गुरूनानक नाम लेवा संगत-समुदाय एकत्रितपणे हा शहिदी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या सर्व समुदायाचा गुरु साहिब बंशी ऐतिहासिक संबंध आहेत. ज्यांनी शतकानुशतके एकता, धैर्य आणि मानवताचा संदेश दिला आहे. हा मेळावा केवळ श्रद्धांजली नाही तर गुरू साहेबांच्या शिकवणी आणि त्यांच्या हौतात्म्यांची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
त्याप्रसंगी गुरु साहेबांचा इतिहास आणि कार्यक्रम जाहीर करण्यासाठी धार्मिक रथ तांडा, गाव, शहर, तहसील आणि जिल्हा पातळीवर प्रचार करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या महान शौर्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन 'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वीं शहीदी समागम राज्यस्तरीय समिती आणि समस्त सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

5
156 views