
कायदेशीर समाजहितासाठी जारी.
दौंड उपजिल्हा रुग्णालय – शासकीय वेळ पालनाबाबत नागरिकांचा सवाल
कायदेशीर समाजहितासाठी जारी.
दौंड उपजिल्हा रुग्णालय – शासकीय वेळ पालनाबाबत नागरिकांचा सवाल
दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेळेच्या आदेशाचे पालन होत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. शासन निर्णय क्रमांक समय २०१६/प्र.क्र ६२/कार्यासन १८ (र.व.का) दि. २९ फेब्रुवारी २०२० नुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची कामकाजाची वेळ सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ अशी निश्चित करण्यात आली आहे व त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
तथापि प्रत्यक्षात रुग्णालयातील काही विभाग, कक्ष हे वरील आदेशाचे पालन करत नसल्याचे आढळून येत असल्याने नागरीकांना आवश्यक त्या सेवाप्रदानामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रिकामे गेट, बंद कक्ष किंवा अनुपस्थित कर्मचाऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. हे शासन आदेशाचे स्पष्ट उल्लंघन आहे.
नागरीकांचा ठाम मागणीप्रमाणे:
1️⃣ शासन वेळेनुसार सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीने करावी
2️⃣ अनुपस्थिती वा विलंबाबाबत उत्तरदायी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी
3️⃣ रुग्णसेवा हा केंद्रबिंदू असल्याने नागरिकांना तत्काळ न्याय द्यावा
दौंड उपजिल्हा रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्याचे महत्त्वाचे केंद्र असून, शासन परिपत्रकांचे पालन न करणे ही शिस्तभंगाची बाब ठरते. त्यामुळे शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, ही नागरिकांची न्याय्य मागणी आहे.
✍️ — समाजहितासाठी जारी