बीड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा; अधिकाऱ्यांशी भेट न मिळाल्याने डॉक्टरांशी चर्चा
बीड — सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार Shaikh Galeb (jan jan ki awaaz) यांनी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर डॉक्टर R.N मुजाहिद सर यांची भेट घेऊन संपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की:“सध्या काही प्रमुख औषधांचा स्टॉक उपलब्ध नाही. कलेक्टर साहेबांचा आदेश आल्यानंतरच नवीन साठा जमा केला जाईल.”औषधांचा तुटवडा सुरूच राहिल्यामुळे रुग्णांना बाहेरून महागड्या औषधांची खरेदी करावी लागत असून सामान्य नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.— ग्राउंड रिपोर्ट : Shaikh Galeb, Beed
https://www.facebook.com/share/v/1DU1rcefMh/