logo

आदिवासी भाषांचा अभिमान – सहभागी व्हा ‘BHASHINI’ कार्यशाळेत!

प्रतिनिधी -उदेसिंग पाडवी
Social media Activitis
Nandurbar (MH)
नंदुरबार जिल्ह्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रमुख आधार म्हणजे येथील आदिवासी भाषा—आहिराणी, मावची, भिली, पावरी आणि इतर स्थानिक बोली. या भाषांचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

हीच भावना जपत दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी कलेक्टर ऑफिस, जिल्हा नियोजन समिती सभागृह, नंदुरबार येथे *‘BHASHINI’* (Government Institute) तर्फे एक एक-दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

🔹 *कोण सहभागी होऊ शकतात?*
आहिराणी, मावची, भिली, पावरी — किंवा या पैकी कोणतीही भाषा बोलता, समजता किंवा शिकण्याची रुची आहे?
👉 मग ही कार्यशाळा खास तुमच्यासाठीच!

🔹 *कार्यशाळेत काय शिकता येईल?*
1. आदिवासी भाषांचे संवर्धन — का आणि कसे?
2. डिजिटल युगात स्थानिक भाषांच्या संधी
3. भाषासंवर्धनासाठी उपलब्ध साधने व आधुनिक तंत्र
4. भाषा शिकण्यासाठी नव्या पद्धती
5. भाषेच्या माध्यमातून प्रकल्प संधी

*सहभागींसाठी लाभ:*
1. डिजिटल प्रमाणपत्र
2. भाषासंवर्धन प्रकल्पांमध्ये भविष्यात सहभागी होण्याची संधी

*नोंदणी व अधिक माहितीसाठी:*
क्षितिजा देशमुख — 9552051991

83
105 views