logo

ओम सत्यसाई महाविद्यालयाची शैक्षणिक सहल यशस्वी

विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- ओम सत्यसाई महाविद्यालय परसोडी च्या वतीने बी.ए. व बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांकरिता उमीयाधाम व शिवतीर्थ येथे शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
बी.ए. च्या विद्यार्थ्यांना वास्तुशिल्पकलेचे तसेच खडकाचे प्रकार व वैशिष्ट्याचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून नागपूर जवळील उमीयाधाम चा वास्तुस्थानाला भेट देण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना वास्तुकलेचे बारकावे त्यात वापरण्यात आलेल खडक या विषयावर माहिती देण्यात आली. तसेच बी.एस.सी. च्या अभ्यासपुरक विषयाअंतर्गत सातपुडा पर्वताच्या कुशीत स्थापीत असलेला शिवतीर्थ Agro पार्क या स्थळी भेट देण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना विविध प्लांट ची ओळख करून देण्यात आली. त्यात Agave (घायपात) Alstonia scholaris (सप्तपर्णी) Acacia catechu (खैर) या सारखे औषधी युक्त विविध प्लांट ची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. त्या वनस्पतीचे उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता.
महाविद्यालयातील शैक्षणिक सहल प्रमुख डॉ. वंदना मोटघरे, प्रगती वैद्य, प्रिया रेपाडे व सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या शैक्षणिक सहल पार पाडली.

5
961 views