logo

नागभीडचा अभिमान! ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण यश

🔸 **नागभीडचा अभिमान! ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण यश**

*नागपूर येथील क्रीडा संकुलात* नुकत्याच 23 नोव्हेंबर, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या **खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत** श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत **2 सुवर्ण व 1 रौप्य पदक** पटकावत नाव उज्ज्वल केले.

या स्पर्धेत 1000 ते 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. "खेलो इंडिया – खेल से ही पहचान" या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.

ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींची कामगिरी पुढीलप्रमाणे –

* **साक्षी गायकवाड** – पॉईंट कॉन्टॅक्ट, वजन गट 54 कि.ग्रा. – **सुवर्णपदक**
* **रेणुका चौके** – सेमी कॉन्टॅक्ट, वजन गट 45 कि.ग्रा. – **सुवर्णपदक**
* **श्रेया सरपाते** – **रजत पदक**

या तिन्ही विद्यार्थिनींची **भारतीय स्तरावरील साउथ झोन स्पर्धेसाठी निवड** झाल्याने शाळा आणि संस्थेचा गौरव अधिक वाढला आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल *समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष* **गणेश तर्वेकर**, *सचिव* **अजय काबरा**, *प्राचार्य* **शुभांगी पोहेकर**, *मुख्याध्यापिका* **संगीता नारनवरे** यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

विद्यार्थिनींनी आपल्या विजयाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्य शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे तसेच क्रीडा शिक्षक **गणेश लांजेवार, महेश जीभकाटे, रुपा ताडूरवार** यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

0
0 views