logo

Aima media jan jan ki Date 4/12/2025 am :3:59 आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त' या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन ! अत्यंत विद्वान, व्यासंगी परंतु विक्षिप्त व पर

'
Aima media jan jan ki
Date 4/12/2025 am :3:59
आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त' या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन !

अत्यंत विद्वान, व्यासंगी परंतु विक्षिप्त व परखड बोलणारे म्हणून प्रसिद्ध असलेले विविध विषयांची आपल्या लेखणीतून आणि वाणीतून निर्भीड चिकित्सा करणारे प्रकांड पंडित कै. शंकर रामचंद्र राजवाडे यांच्या जीवन कार्यावर आधारित 'आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त' या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन श्रीविद्या प्रकाशनच्या संचालिका सौ. श्रीती निखिल कुलकर्णी यांनी केले.

'आहिताग्नी' ही पदवी श्री राजवाडे यांना मिळाली कारण त्यांनी आपल्या घरी अखंड अग्निहोत्र प्रज्वलित ठेवला होता. त्यांचे काही विचार कोणत्याच काळात कोणालाच पटण्यासारखे वाटत नाहीत. तर काही मात्र आजही कालसुसंगत वाटतात. उदाहरणार्थ, "राष्ट्रातील नागरिकांना असे शिक्षण मिळायला हवे, ज्याने ते राष्ट्रासाठी वेळप्रसंगी प्राण देण्यासही तयार होतील, अशी राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या मनात तयार होईल" हे विचार आजही आपल्याला पटतात.

ऐतिहासिक व्यक्तींकडे, त्यांच्या कृती अगर वक्तव्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहून त्यातील गुणदोषांसकट त्यांचे विचार वाचणे व त्याचे विश्लेषण करून योग्य विचारांचा अंमल करून अयोग्य विचार टाळणे हे आवश्यक असते.

1979 साली या पुस्तकाचे सर्वप्रथम प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाच्या फार कमी प्रति अलीकडे उपलब्ध होत्या.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी खासदार श्री. कुमार केतकर, श्री. हर्ष जोशी तसेच श्री. हेमंत प्रकाश राजोपाध्ये उपस्थित होते.

0
0 views