logo

रविकुमार प्रदीप शिंदे यांना “भारत गौरव सम्मान पुरस्कार” 🌟**



जामखेड : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजासाठीची निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणाऱ्या सततच्या वृत्तांकनासाठी ईएसओ इंडिया फाउंडेशनतर्फे दिला जाणारा “भारत गौरव सम्मान पुरस्कार” यंदा रवि कुमार प्रदीप शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारासोबत त्यांना “वर्षाचा सर्वश्रेष्ठ रिपोर्टर” हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला.

भव्य समारोहात हा सन्मान संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण सिंह, राष्ट्रीय संगठन प्रमुख राजकुमार चक्रवर्ती, तसेच नेशनल जनरल (संगठन) अनिल याग्निक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की,
“राष्ट्रीय बांधिलकी, प्रामाणिक पत्रकारिता व समाजहितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची ही योग्य दखल आहे.”

सन्मान स्वीकारताना रवि कुमार प्रदीप शिंदे यांनी सांगितले की,
“हा पुरस्कार माझ्या कार्याची प्रतिष्ठा वाढवणारा असून समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.”

या सन्मानामुळे जामखेड तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांसाठी ही प्रेरणादायी बाब मानली जात आहे.


---

33
3043 views