सोलापूर जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार
सोलापूर जिल्हा परिषद ही आयएसओ असलेली जिल्हा परिषद म्हणून डिंगोरा पेटणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे सी ओ हे निष्क्रिय असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये असलेले टेलिफोन्स बिल न भरल्यामुळे बंद आहेत. याकडे वारंवार लक्ष्य वेधूनही सी ओ वर काहीही फरक पडत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्रव्यवहारावर काहीही कारवाई होत नाही ऑफिसमध्ये लोकांना भेटण्यासाठी सी.ओ.वेळ नसतो. त्यांचे स्वीय सहाय्यक हे नेहमी खोटे बोलतात. पिंडीवर विंचू बसल्यागत हे स्वीय सहाय्यक अनेक वर्षापासून सी.ओ.ऑफिसमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
सी. ओ. ऑफीस मध्ये पेपर जुने ठेवलेले असतात. बहुतेक जिल्हा परिषद कडे पेपर घेण्यासाठी पैसे नाहीत.
टेलिफोन बिल भरण्यासाठी लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये भिक मागो आंदोलन करून ते पैशा जमा करून जिल्हा परिषदेचे टेलिफोन चालू करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भजनदास पवार यांनी घेतली असल्याचे सांगितले