
निसर्ग व ऐतिहासिक शैक्षणिक सहल गुरुवार , दि .२५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे .
पनवेल :
निसर्गप्रेम, इतिहासभान आणि पर्यावरणजाणिव यांचा संगम साधणारी “निसर्ग व ऐतिहासिक शैक्षणिक सहल” गुरवार , दि . २५ डिसेंबर २०२५ रोजी पनवेल परिसरात आयोजित करण्यात आली आहे. ही सहल विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील निसर्गप्रेमींना अभ्यासपूर्ण व अनुभवसमृद्ध ठरणार आहे.
या सहलीमध्ये पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक (शिरढोण) येथे ऐतिहासिक माहिती, कर्नाळा पक्षी अभयारण्यात नेचर ट्रेल, युसूफ मेहर अली सेंटर (तारा) येथे मार्गदर्शन, तसेच गो ग्रीन नर्सरी (तारा) येथे पर्यावरणपूरक उपक्रमांची ओळख करून दिली जाणार आहे. यासोबतच सहभागींकरिता विविध निसर्ग खेळ आयोजित करण्यात येणार आहेत.
सहलीचे शुल्क रु. ७९९/- असून त्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता व पनवेल ते पनवेल प्रवासाची व्यवस्था समाविष्ट आहे.
ही सहल निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली; सेवा ट्रस्ट, डोंबिवली; तसेच नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
नोंदणीची अंतिम मुदत दि. १० डिसेंबर २०२५ असून, मर्यादित जागांमुळे इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क :
वैभव कुलकर्णी : – ९८६९६३५५५८
दिलीप राहुरकर : – ९८२०४५९३४५
सौरभ मुळ्ये : – ९८९२४४४३०५
अनिशा हातमोडे : – ७३८५९४७६१८