जमाव पांगवण्यासाठी जामनेरात पोलिसांचा लाठीमार
जामनेर : शहरातील एका मतदान केंद्रावर मतदानसंपल्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करीत मिरवणूक काढली. मिरवणूक सुरू असताना समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हातघाईवर आले. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला.हा प्रकार जि. प. उर्दू शाळेतील मतदान केंद्रासमोर मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडला.जामनेर नगरपालिकेसाठी मतदान सुरु असतांना दोन केंद्रांवर बोगस मतदान करताना तरुणीसह चार जणांना पकडण्यात आले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर. तरुणीचे आधारकार्ड जप्त करुन तिला सोडून देण्यात आले.