logo

काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील कच-याच्या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुलकुमार मीना

*काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील कच-याच्या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुलकुमार मीना साहेब यांची घेतली भेट...‌लवकरच मार्ग काढण्याचे श्री.मीना साहेब यांचे सकारात्मक आश्वासन*🙏🏻👍🏻

काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील सर्व सन्माननीय नागरिकांना कळविण्यात येते की, *मागील ३ ते ४ महिन्यांपासून आपल्या ग्रामपंचायत मध्ये कचऱ्या संदर्भात जो गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत,* ज्यात कच-याचे संकलन व नियोजन व्यवस्थित रित्या केले जात नाही, आपल्या ग्रामपंचायत मधील जमा होणारा कचरा महानगरपालिकेच्या वरवंटी येथील कचरा डेपोमध्ये जाणीवपूर्वक टाकू दिला जात नाही. *त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत मध्ये सगळीकडे कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी वाढली आहे, त्यामुळे कुत्र्यांचा, डुकरांचा आपल्या सर्वांना त्रास होत आहे* ( त्यामुळेच आपण मागील दोन महिन्यांपासून जवळपास ३ टप्प्यांमध्ये २०० पेक्षा जास्त डुकरांना पकडून आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर खूप लांब हलविण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या हद्दीतील बऱ्याच नागरिकांना डुकरांपासून होणारा त्रास कमी झाला आहे )
आपल्या कडे घंटागाडी मार्फत जमा झालेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण तो कचरा महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये पाठवत होतो कारण आपली ग्रामपंचायत नविन असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी नाही, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोतच. लवकरच तो पण प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे.
*वरील कच-याच्या समस्येवर मागील २ ते ३ महिन्यापासून आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.रेड्डी साहेब व गटविकास अधिकारी श्री.गोडभरले साहेब यांच्याशी लेखी व तोंडी स्वरूपात विनंती केली होती. त्यांनी या सर्व समस्येबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवले होते. या गंभीर समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढून आपल्या ग्रामपंचायत मधील सर्व सन्माननीय नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.राहुलकुमार मीना साहेब यांची भेट घेऊन वरील सर्व गंभीर समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यांनी वरील सर्व समस्या अतिशय गांभीर्याने घेत लवकरच याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.*
*यावेळी आपल्या ग्रामपंचायतीचे संस्थापक तथा निर्माते ॲड.किरण आर.बडे, ॲड.प्रभाकर केदार, विष्णू काका शिंदे, रघुनाथ गिरी, उदय भैय्या गोजमगुंडे, आकाश जमादार, ॲड.योगेश बनसुडे, परमेश्वर माने आदी जण उपस्थित होते.*

21
661 views