धुळे पोलीस अधीक्षक धिवरेंच्या कुटुंबियांनी घडविले माणुसकीचे दर्शन, वाढत्या थंडीमुळे दिला बेघरांना ब्लॅंकेट चा आसरा !!
दि.1डिसेंबर. ( धुळे)... पोलीस अधीक्षक सन्मा. श्रीकांत धिवरे यांच्या परिवाराने घडविले माणुसकीचे दर्शन... 🙏🙏💐💐
वाढत्या थंडीमुळे दिला बेघरांना ब्लॅंकेट चा आसरा..
धुळे शहरातील थंडीचा तडका अचानक वाढला असून रात्री थंडीने हुडहुडी भरत आहे. अश्या वातावरणात बेघर निराधार लोकांना मदतीचा हात देत धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सौ. सानिका धिवरे आणि मुलगा अर्णव धिवरे यांनी शहरात रात्री अनेक ठिकाणी थंडीपासून बचावा करिता ब्लॅंकेट चे वाटप केले.त्यांच्या या सेवाभावी स्वभावाचे सर्वांनी कौतुक केले असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून निराधार लोकांना एक छोटीशी मदत म्हणून ब्लॅंकेट वाटप करीत असल्याचे सांगितले..!!!!