logo

लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने, घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख 17 हजार रुपयांच्या 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यांसह ए

लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने, घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख 17 हजार रुपयांच्या 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यांसह एक आरोपी अटक.

लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून ज्वेलर्स दुकाने, बँक तसेच घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या कारवाईमध्ये एक आरोपीला ताब्यात घेऊन एकूण 24,17,900/_ रुपये किंमतीचा 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीतील आणखी चार आरोपी फरार असून त्यांचा तपास जलदगतीने सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांचे निर्देशांवर,अपर पोलीस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर , स्थानीक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 30/11/2025 गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळवून नवीन रेणापुर नाका परिसरात सापळा लावून 14:00 वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या रोडवर उभा असलेल्या रोशनसिंग बबलुसिंग टाक (वय 20 वर्षे), रा. संजयनगर, देऊळगावराजा, जि. बुलढाणा यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने, चैन, करदोरे तसेच सोन्याचे दागिने आढळून आले.

चौकशीदरम्यान रोशनसिंग टाक याने त्याच्यासोबतच्या आणखीन चार फरार साथीदारांसह 1)अहमदपुर सराफ लाईन – अमित ज्वेलर्स व विठ्ठल ज्वेलर्स येथे 2)काजळी हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत 3)अहमदपुर मधील एका घरात 4)मदनसुरी येथील विश्वकर्मा ज्वेलर्स व 5)परशुराम पार्क, लातूर येथील एका घरात असे एकूण पाच ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने लातूर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात विक्री केल्याची कबुली दिली आहे.

नमूद आरोपीकडून 13 किलो 700 ग्रॅम चांदी चे दागिने व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण किंमत : ₹ 24,17,900 रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपीच्या टोळीने लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे अहमदपूर येथील तीन घरफोडीचे गुन्हे तर पोलीस ठाणे कासार शिरशी व एमआयडीसी येथील प्रत्येकी एक चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी रोशनसिंग बबलुसिंग टाक यास जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस ठाणे अहमदपुर गु.र.नं. 618/2025 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि सदानंद, भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोउपनि राजाभाऊ घाडगे, प्रमोद देशमुख पोलीस अमलदार माधव बिलापटटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, मोहन सुरवसे, राजेश कंचे, युवराज गिरी, गणेश साठे, शैलेश सुडे, श्रीनिवास जांभळे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, प्रज्वल कलमे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

6
100 views